Earwig's Copyvio Detector

Settings

This tool attempts to detect copyright violations in articles. In search mode, it will check for similar content elsewhere on the web using Google, external links present in the text of the page, or Turnitin (via EranBot), depending on which options are selected. In comparison mode, the tool will compare the article to a specific webpage without making additional searches, like the Duplication Detector.

Running a full check can take up to a minute if other websites are slow or if the tool is under heavy use. Please be patient. If you get a timeout, wait a moment and refresh the page.

Be aware that other websites can copy from Wikipedia, so check the results carefully, especially for older or well-developed articles. Specific websites can be skipped by adding them to the excluded URL list.

Site: https:// . .org
Page title: or revision ID:
Action:
Results generated in 1.49 seconds using 1 query. Permalink.
Article:

मराठीतील एकंदर कोशांची संख्या अदमासे हजाराच्या घरात जाईल. शब्दकोश, ज्ञानकोश/विश्वकोश, तत्त्वज्ञानकोश, चरित्रकोश, समाजविज्ञानकोश, तिथिकोश, संख्यासंकेतकोश, सुविचारकोश, ग्रंथसूची, जंत्री आणि शकावली, निदेशपुस्तके, निर्देशिका, वार्षिके व पंचांगे, भौगोलिक कोश-ग्रामसूची, गॅझेटियर्स असे कोशांचे निरनिराळे प्रकार मराठीत आढळतात.

शब्दकोश

संख्येने सर्वाधिक, उपप्रकारांत सर्वाधिक आणि सर्वांच्या परिचयाचा कोशप्रकार म्हणजे शब्दकोश होय. मराठीतील निव्वळ शब्दकोशांची संख्या ४०० च्या घरात जाईल. मराठी भाषेत स्वातंत्र्यपूर्व काळात १३४ तर स्वातंत्र्योत्तर काळात २७० पेक्षा अधिक शब्दकोश निर्माण झाले.

मराठीतील पहिला शब्दकोश म्हणजे विल्यम कॅरे यांनी १८१० मध्ये प्रकाशित केलेला 'मराठी-इंग्रजी कोश' (अ डिक्शनरी ऑफ दी मऱ्हाटा लॅंग्वेज). हा कोश पंडित विद्यानाथ (वैजनाथ शर्मा) यांच्या मदतीने तयार केल्याचे प्रस्तावनेत म्हटले आहे. वैजनाथ शर्मा हे कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजमधील मराठीचा प्रमुख पंडित होते. या कोशाची पृष्ठसंख्या ६५२ असून यात मराठी शब्द मोडी लिपीत व अर्थ इंग्लिश भाषेत दिला आहे.

दुसरा कोश
लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी या लष्करी अधिकाऱ्याने मुंबई येथे इ. स. १८२४ मध्ये प्रसिद्ध केला. या कोशाचे दोन भाग असून पहिल्या भागात मराठी शब्दांना इंग्लिश प्रतिशब्द देऊन दुसऱ्या भागात इंग्लिश शब्दांचे मराठी अर्थ दिलेले आहेत. कोशातील शब्दसंख्या आठ हजारपर्यंत आहे.

वरील कोशांपेक्षा खूप मोठा आणि आजही पुनर्मुद्रणे होत असल्याने सहज उपलब्ध असलेला शब्दकोश म्हणजे मोल्सवर्थ-कॅंडी यांनी संपादित केलेली मराठी ॲन्ड इंग्लिश डिक्शनरी. हा कोश इ.स. १८५७मध्ये प्रकाशित झाला. अरबी-फार्सी-तुर्कीमधून आलेले शब्द देवनागरीबरोबर उर्दू लिपीतही लिहून दाखवले आहेत. हा चमत्कार यानंतर करायला कुणीही धजले नाही. या कोशाच्या ३०-पानी प्रस्तावनेत मराठी शब्दांच्या बनावटीबद्दल विद्वत्तापूर्ण भाष्य आहे. कोकणी, राजापुरी, वाडी जिल्ह्यातले शब्द, उत्तर महाराष्ट्रातले शब्द, पोर्तुगीज, अरबी, फारसी, तुर्की आणि हिंदुस्तानी शब्द वगैरे देताना हे शब्द कुठून आले ते सांगितले आहे. काही खास शब्दांबाबत त्यांचा वाक्यांतला आणि वाक्प्रचार-म्हणीतला वापर स्पष्ट केला आहे. या कोशात डेमी आकारातली ९२० पाने आहेत. शब्दांची जंत्री तीन स्तंभात असून कोठेही जागा वाया घालवलेली नाही. टंकाचा आकारही खूप लहान घेतला आहे. मराठी-इंग्रजी डिक्शनरीबरोबरच मोल्सवर्थने अर्धवट लिहून ठेवलेला इंग्रजी-मराठी कोशही कॅंडीने पूर्ण केला.

शब्दकोशांची विभागणी एकभाषिक, द्विभाषिक आणि बहुभाषिक अशी करता येते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने उर्दू-मराठी (श्रीपाद जोशी, एन.एस. गोरेकर), कन्नड-मराठी (पुंडलिकजी कातगडे), गुजराती-मराठी (भाऊ धर्माधिकारी), पाली-मराठी (बाबा भारती), मराठी-कन्नड (गुरुनाथ दिवेकर), मराठी-गुजराती (भाऊ धर्माधिकारी), मराठी-सिंधी (लछमन हर्दवाणी), तमिळ-मराठी (रमाबाई जोशी, पु. दि. जोशी), मराठी-रशियन-जर्मन कोश (सुनंदा महाजन, अनघा भट, योगेंद्रकुमार) यांसारखे कोश प्रकाशित केले आहेत.

मराठी शब्दकोश

मराठी शब्दरत्नाकर (मराठी शब्दांचा मराठी अर्थ देणारा कोश) लेखक कै. वासुदेव गोविंद आपटे संपादक-य.गो. जोशी, आनंद कार्यालय ३३ सदाशिव पेठ पुणे, लिपी-देवनागरी, चौथी आवृत्ती १९५६,शब्दसंख्या ८० हजार, वैशिष्टे-

१९४६पर्यंत १८ मराठी शब्द कोश झाले

युरोपियन लष्करी शब्दांची परिभाषा (गोविंदराव काळे-पेशव्यांचे वकील)

१८१० केरीचा शब्द कोश (१८१०)

के ते डी चा कोश (१८२४)

शास्त्राचा मराठी -मराठी शब्द कोश (१८२९)

रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा हंस कोश (१८६३)

माधव चंद्रोबांचा संस्कृत शब्दरत्नाकर (१८७०)

संस्कृत- प्राकृत कोश (१८६७)

रखमाजी देवजी मुळेकृत हिंदुशास्त्रातील संख्याबोध-दुर्बोध

संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश वाङ्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश (वसंत आबाजी डहाके)

शालेय मराठी शब्दकोश (वसंत आबाजी डहाके)

ज्ञानकोश/विश्वकोश

श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी तयार केलेला 'ज्ञानकोश' ही मराठी कोशवाङ्मयातील अत्यंत महत्त्वाची, ऐतिहासिक स्वरूपाची अद्वितीय कामगिरी आहे. ज्ञानकोश याचा अर्थ सर्व विद्याशाखांतील माहितीचा पद्धतशीरपणाने केलेला संग्रह. तो इथे नेमकेपणी पाहायला मिळतो.

मराठीतील ज्ञानकोशांची संख्या आता शंभरच्या घरात गेली आहे. तीत मुलांचे ज्ञानकोश, सर्वसंग्राहक कोश, विषयज्ञानकोश अशी भरपूर विविधता आहे.
हा ज्ञानकोश आंतरजालावर मोफत वाचता येतो.

स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली 'मराठी विश्वकोशा'ची निर्मिती सुरू केली. 'विश्वकोश' हा मराठी माणसाला जागतिक पातळीवरचे ज्ञान आत्मसात करायला मदत करणारा ज्ञानकोश आहे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वविकासाशी, त्याच्या प्रगल्भतेशी साहित्याचा व संस्कृतीचा संबंध असतो याचे भान राखून विश्वकोशाची निर्मिती झाली आहे. १९७६मध्ये विश्वकोशाचा पहिला खंड प्रसिद्ध झाला. इ.स.२०१६मध्ये विसावा खंड पूर्ण होऊन विश्वकोशाची मूळ योजना मार्गी लागेल. हाही ज्ञानकोश आंतरजालावर पहाता येतो, आणि तो सीडीरूपातही विकत मिळतो.

संस्कृतिकोश

महादेवशास्त्री जोशी यांनी १९६२ ते १९७९ या काळात दहा खंडांचा 'भारतीय संस्कृतिकोश' ही महत्त्वाची कोशनिर्मिती केली. संस्कृतीचे विविध घटक लक्षात घेऊन केलेल्या सुमारे बारा हजार नोंदी या कोशात आहेत. या कोशाप्रमाणेच दोन हजार पृष्ठांचा, चार खंडांतील मुलांचा संस्कृतिकोशही महादेवशास्त्रींनी निर्माण केला.

तत्त्वज्ञानकोश

देवीदास दत्तात्रय वाडेकर यांचा त्रिखंडात्मक 'मराठी तत्त्वज्ञान महाकोश'

ह.श्री. शेणोलीकर यांचा 'मराठी संत-तत्त्वज्ञान संज्ञा कोश' (१९९४). हा कोश मध्य युगीन मराठी वाङ्मयाच्या आधारे लिहिलेला तत्त्वज्ञान संकल्पाना विषयक कोश आहे. या कोशासाठी इ.स. ११८८मध्ये प्रकाशित झालेल्या विवेकसिधूपासून ते इ.स. १७५० मधल्या सोहिरोनाथांच्या महद् अनुभवेश्वरी पर्यंतचे २० ग्रंथ, ९ साहाय्यक ग्रंथ, मराठी तत्त्वज्ञान महाकोश (संपादक प्रा. दे.द. वाडेकर) आदी पुस्तकांचा आधार घेतला आहे.

रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी १८७६ मध्ये रचलेला 'भारतवर्षीय ऐतिहासिक कोश'

गं.दे. खानोलकररचित 'अर्वाचीन मराठी वाङ्मय सेवक' (भाग १ ते ७)

सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा 'भारतवर्षीय प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन चरित्रकोश' खंड १, २ व ३.

श्रीराम पांडुरंग कामत यांनी 'विश्वचरित्रकोशा'ची सहा खंडांत रचना केली आहे. या कोशात मानवी संस्कृतीच्या आरंभकाळापासून विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंतच्या काळातील विविध देशांतील, विविध क्षेत्रांतील पायाभरणीचे कार्य करणाऱ्या जवळपास बारा हजार व्यक्तींच्या चरित्रांची नोंद आहे.

प्र.न. जोशी यांचा प्राचीन काळापासून अंतराळयुगापर्यंतच्या सुमारे २००० प्रमुख शास्त्रज्ञांचा, तंत्रज्ञांचा, संशोधकांचा नेटका परिचय करून देणारा ‘जागतिक शास्त्रज्ञकोश’.

बा.द. सातोस्कररचित 'गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार' हा दोन खंडी कोश

सुहास कुळकर्णी व मिलिंद चंपानेरकर यांचा 'यांनी घडविले सहस्रक' (२००९)

अनंत जोशी यांचा द्विखंडात्मक 'मराठी सारस्वत'
कोश.

भारत वर्षीय अर्वाचीन चरित्र कोश, लेखक -सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्रकाशक - भारतीय चरित्र कोश मंडळ, आवृत्ती १९४६. वैशिष्ट्ये : कोणत्याही क्षेत्रात विशेष चमकलेल्या व्यक्तींची चरित्रे यात आहेत. अट्टल चोर मंगलदास गांधी ते रामकृष्ण परमहंसपर्यंत व जन्माने परकीय पण ज्यांनी भारत ही कर्मभूमी पत्करली त्यांचाही अंतर्भाव यात आहे. महाराष्ट्रीयांची अधिक चरित्रे यात आली आहे. १-६-१९२९ ते इ.स. १९४६ मिळून २२०० पृष्ठांत एकूण १९ हजार चरित्रे आली आहेत.

गे यांनी संपादित केलेला सहा-खंडी 'भारतीय समाजविज्ञान कोश'. या कोशात समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे तीन विषय व त्या विषयास पूरक अशा नोंदी आल्या आहेत.

समाजविज्ञानकोश

स.मा. गर्गे यांनी संपादित केलेला सहा-खंडी 'भारतीय समाजविज्ञान कोश'. या कोशात समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे तीन विषय व त्या विषयास पूरक अशा नोंदी आल्या आहेत.

राजेंद्र व्होरा व सुहास पळशीकर यांनी निर्मिलेला राज्यशास्त्रातील संज्ञा-संकल्पनांचा, मतमतांतरांचा व राज्यशास्त्राच्या प्रगत अभ्यासाचा
'राज्यशास्त्र कोश'.

वर्ग:कोश साहित्य वर्ग:मराठी भाषा

Source:

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

Marathi हिन्दी ಕನ್ನಡ മലയാളം తెలుగు தமிழ் বাংলা Samayam ગુજરાતી English IND US Photogallery मटा संवाद संपादकीय महाराष्ट्र लोकसभा 2024 IPL 2024 सिनेमा न्यूज लाइफस्टाइल कार-बाइक इन्फोटेक करिअर Marathi News editorial samwad Kosh कोशवाङ्मयाने समृद्ध मराठी Maharashtra Times |

28 Feb 2016, 4:00 am

Follow Subscribe

कोशवाङ्मय म्हणजे एकप्रकारे ज्ञानाचं आगार. एखाद्या भाषेत कोशवाङ्मय जेवढं अधिक, त्यावरून त्या भाषेची श्रीमंती ठरत असते. मराठी भाषेला कोशवाङ्मयाची अशी समृद्धी निश्चित लाभलेली आहे. काल साजऱ्या झालेल्या भाषा दिनाच्यानिमित्ताने या श्रीमंतीचा घेतलेला मागोवा…

कोशवाङ्मयाने समृद्ध मराठी विलास खोले

भारतात ब्रिटिशांची सत्ता आल्यानंतर इंग्रजी विद्येला आरंभ झाला, ग्रंथरचनेला आरंभ झाला आणि त्याचबरोबर कोशनिर्मितीला चालना मिळाली. इ. स. १८१८ मध्ये पेशवाई संपुष्टात आली आणि इंग्रजांची राजवट सुरू झाली. राज्यकारभार सुकर होण्यासाठी, जनसंपर्काच्या प्रस्थापनेसाठी आणि व्यवस्थापनाच्या सोयीसाठी इंग्रजांना स्थानिक भाषेचे ज्ञान व एकंदर जीवनव्यवहाराचे आकलन अत्यावश्यक होते. आपली सत्ता टिकविण्याच्या दृष्टीने ब्रिटिशांना येथील भाषा व भूप्रदेश यांचे अधिकाधिक ज्ञान करून घेणे अपरिहार्य वाटत होते. त्या दृष्टीने त्यांनी जे जे उपक्रम सुरू केले त्यांपैकी एक म्हणजे कोशवाङ्मयनिर्मितीला त्यांनी दिलेले उत्तेजन व प्राधान्य. याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय पातळीवरील आणि प्रांत व जिल्हा पातळीवरील जी गॅझेटियर्स तयार करून घेतली त्यांद्वारा त्यांना येथील भूप्रदेशाची संस्कृती, लोकजीवन इत्यादीसंबंधीची भरपूर माहिती उपलब्ध झाली. मोल्स्वर्थ, कँडी यांनी इंग्रजी-मराठी व मराठी-इंग्रजी कोश तयार केले. ती परंपरा आजतागायत चालू राहिली आहे. कोणत्याही भाषेच्या समृद्धीचे व विकसनक्षमतेचे एक गमक त्या भाषेत निर्माण झालेल्या कोशवाङ्मयावरून आपल्या हाती येते. मराठी भाषेत आजवर निर्माण झालेले बहुविध कोश पाहिले म्हणजे मराठी भाषा कोशसंपन्न आहे, तशीच ती समृद्धही आहे याची खात्री पटते.

कोश या संज्ञेमागे माहिती वा ज्ञान देण्याच्या उद्देशाने हेतूत: केलेली रचना ही संकल्पना आहे. समाजाच्या भाषिक व जीवनव्यवहाराच्या वेगवेगळ्या अंगांसंबंधीचे ज्ञान सर्वांना उपलब्ध करून देण्याच्या हेतूने कोशांची रचना केली जाते. आज कोशांचे जेवढे म्हणून प्रकार अस्तित्वात आहेत, त्यांपैकी बहुतेक सर्व प्रकार मराठीत आहेत. मराठीतील एकंदर कोशांची संख्या अदमासे हजाराच्या घरात जाईल. ज्ञानकोश/विश्वकोश, शब्दकोश, चरित्रकोश, तिथिकोश, संख्यासंकेतकोश, सुविचारकोश, ग्रंथसूची, जंत्री आणि शकावली, निदेशपुस्तके, निर्देशिका, वार्षिके व पंचांगे, भौगोलिक कोश-ग्रामसूची, गॅझेटियर्स असे कोशांचे निरनिराळे प्रकार मराठीत आढळतात. मराठीतील निव्वळ शब्दकोशांची संख्या ४००च्या घरात जाईल.

संख्येने सर्वाधिक, उपप्रकारांत सर्वाधिक आणि सर्वांच्या परिचयाचा कोशप्रकार म्हणजे शब्दकोश होय. मराठीतील पहिला शब्दकोश म्हणजे विल्यम कॅरे यांनी १८१० मध्ये प्रकाशित केलेला ‘मराठी-इंग्रजी कोश’ (अ डिक्शनरी ऑफ दी मऱ्हाटा लँग्वेज). हा कोश पंडित विद्यानाथ (वैजनाथ शर्मा) यांच्या मदतीने तयार केल्याचे प्रस्तावनेत म्हटले आहे. वैजनाथ शर्मा हा कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजमधील मराठीचा प्रमुख पंडित होता. या कोशाची पृष्ठसंख्या ६५२ असून यात मराठी शब्द मोडी लिपीत व अर्थ इंग्लिश भाषेत दिला आहे. दुसरा कोश ले. क. व्हान्स केनेडी या लष्करातील साहेबाने मुंबई येथे इ. स. १८२४ मध्ये प्रसिद्ध केला. या कोशाचे दोन भाग असून पहिल्या भागात मराठी शब्दांना इंग्लिश प्रतिशब्द देऊन दुसऱ्या भागात इंग्लिश शब्दांचे मराठी अर्थ दिलेले आहेत. कोशातील शब्दसंख्या आठ हजारपर्यंत आहे.

मराठी भाषेत स्वातंत्र्यपूर्व काळात १३४ तर स्वातंत्र्योत्तर काळात २७० पेक्षा अधिक शब्दकोश निर्माण झाले.
यांची विभागणी एकभाषिक, द्विभाषिक आणि बहुभाषिक अशी करता येते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने शब्दकोशाच्या संदर्भात केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. गुजराती-मराठी (भाऊ धर्माधिकारी), उर्दू-मराठी (श्रीपाद जोशी, एन. एस. गोरेकर), कन्नड-मराठी (पुंडलिकजी कातगडे), तमीळ-मराठी (रमाबाई जोशी, पु. दि. जोशी), मराठी-कन्नड (गुरुनाथ दिवेकर), मराठी-सिंधी (लछमन हर्दवाणी), मराठी-गुजराती (भाऊ धर्माधिकारी), पाली-मराठी (बाबा भारती) यांसारखे कोश मंडळाने प्रकाशित केले आहेत.

श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी सिद्ध केलेला ‘ज्ञानकोश’ ही मराठी कोशवाङ्मयातील अत्यंत महत्त्वाची, ऐतिहासिक स्वरूपाची अद्वितीय कामगिरी म्हणता येईल. ज्ञानकोश याचा अर्थ सर्व विद्याशाखांतील माहितीचा पद्धतशीरपणाने केलेला संग्रह. तो इथे नेमकेपणी पाहायला मिळतो. मराठीतील ज्ञानकोशांची संख्या आता शंभरच्या घरात गेली आहे. तीत मुलांचे ज्ञानकोश, सर्वसंग्राहक कोश, विषयज्ञानकोश अशी भरपूर विविधता आहे.

स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली ‘मराठी विश्वकोशा’ची निर्मिती सुरू केली. ‘विश्वकोश’ हा मराठी माणसाला जागतिक पातळीवरचे ज्ञान आत्मसात करायला मदत करणारा
प्रकल्प आहे. माणसाच्या व्यक्तिमत्त्वविकासाशी, त्याच्या प्रगल्भतेशी साहित्याचा व संस्कृतीचा संबंध असतो याचे भान राखून विश्वकोशाची निर्मिती झाली आहे. १९७६मध्ये विश्वकोशाचा पहिला खंड प्रसिद्ध झाला. तर वर्षभरात विसावा खंड पूर्ण होऊन विश्वकोशाची मूळ योजना मार्गी लागेल.

विश्वकोशाइतकीच मराठीतील महत्त्वाची कोशनिर्मिती म्हणून महादेवशास्त्री जोशी यांनी १९६२ ते १९७९या काळात सिद्ध केलेला दहा खंडांचा ‘भारतीय संस्कृतिकोश’ ही महत्त्वाची कोशनिर्मिती आहे. संस्कृतीचे विविध घटक लक्षात घेऊन केलेल्या सुमारे बारा हजार नोंदी या कोशात आहेत. या कोशाप्रमाणेच दोन हजार पृष्ठांचा, चार खंडांतील मुलांचा संस्कृतिकोशही महादेवशास्त्रींनी निर्माण केला.

संस्कृतिकोशाखेरीज अन्य विषयांचे स्वतंत्र कोशही मराठीत अनेक आहेत. देवीदास दत्तात्रय वाडेकर यांचा त्रिखंडात्मक ‘मराठी तत्त्वज्ञान महाकोश’, ह. श्री. शेणोलीकर यांचा ‘मराठी संत-तत्त्वज्ञान संज्ञा कोश’ (१९९३-९४) या दोहोंमधून तत्त्वज्ञानसंबद्ध बहुविध तपशील सुस्पष्टपणे आला आहे. स. मा. गर्गे यांनी संपादित केलेल्या ‘भारतीय समाजविज्ञान कोशा’च्या सहा खंडांत समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे तीन विषय व त्या विषयास पूरक अशा नोंदी आल्या आहेत. राजेंद्र व्होरा व सुहास पळशीकर यांनी निर्मिलेला ‘राज्यशास्त्र कोश’ राज्यशास्त्रातील संज्ञा-संकल्पनांचा, मतमतांतरांचा व राज्यशास्त्राच्या प्रगत अभ्यासाचा परिचय करून देतो.

भारतीय भाषांत पहिल्यांदा चरित्रकोशनिर्मिती करण्याचा मान मराठी भाषेने मिळविला आहे. या दृष्टीने रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी १८७६ मध्ये रचलेला ‘भारतवर्षीय ऐतिहासिक कोश’ महत्त्वाचा आहे. गं. दे. खानोलकररचित ‘अर्वाचीन मराठी वाङ्मय सेवक’ (भाग१ ते ७) आणि सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा ‘भारतवर्षीय प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन चरित्रकोश’ खंड १,२ व ३ या कोशांचा येथे गौरवपूर्वक उल्लेख करावयास हवा. अलीकडील काळात श्रीराम पांडुरंग कामत यांनी ‘विश्वचरित्रकोशा’ची सहा खंडांत रचना केली आहे. अन्य कोणत्याही भारतीय भाषांत अद्याप विश्वचरित्रकोश निर्माण झालेला नाही. या कोशात मानवी संस्कृतीच्या आरंभकाळापासून विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंतच्या काळातील विविध देशांतील, विविध क्षेत्रांतील पायाभरणीचे कार्य करणाऱ्या जवळपास बारा हजार व्यक्तींच्या चरित्रांची नोंद केली आहे. प्र. न. जोशी यांनी प्राचीन काळापासून अंतराळयुगापर्यंतच्या सुमारे २००० प्रमुख शास्त्रज्ञांचा, तंत्रज्ञांचा, संशोधकांचा नेटका परिचय करून देणारा जागतिक शास्त्रज्ञकोश निर्माण केला आहे. बा. द. सातोस्कररचित ‘गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार’ या कोशाचे दोन खंड माहितीपूर्ण आहेत. सुहास कुळकर्णी व मिलिंद चंपानेरकर यांचा ‘यांनी घडविले सहस्रक’ (२००९) आणि अनंत जोशी यांचा द्विखंडात्मक ‘मराठी सारस्वत’ हे कोशही मुद्दाम निर्देश करण्याजोगे आहेत.

राज्य मराठी विकास संस्थेने जाणीवपूर्वक व प्रयत्नपूर्वक अनेक कोशांची निर्मिती केली आहे. त्यांत ‘शालेय मराठी शब्दकोश’ (संपादक - वसंत आबाजी डहाके, गिरीश पतके), इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रा. वि. सोवनी यांनी सिद्ध केलेला ‘विज्ञान संकल्पना कोश’ (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र) व. वा. इनामदार व शे. शं. तासगावकर (कांबळे) यांनी तयार केलेला ‘मराठी लघुलेखन शब्दकोश’ यांचा उल्लेख अपरिहार्य आहे.

एके काळी भाषाविषयक कोशांनाच कोशनिर्मितीच्या संदर्भात प्राधान्य दिले जात असे. हळूहळू वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधील ज्ञानसंकलनाचे, संकल्पनास्पष्टीकरणाचे, पारिभाषिक संज्ञा उलगडून दाखवण्याचे कार्यही कोशनिर्मितीद्वारे होऊ लागले. जीवनव्यवहारात भाषेचा समजूतदारपणे उपयोग केला जावा यासाठी पारिभाषिक शब्दकोशांची निर्मिती अतिशय उपयुक्त ठरते. विशेषत: महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर व मराठीत सर्व कारभार सुरू झाल्यानंतर पारिभाषिक शब्दकोश ही एक अपरिहार्य गरज होऊन बसली. महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या भाषा संचालनालयाने संबंधित विषयांतील विद्वानांचे साहाय्य घेऊन अर्थशास्त्र, धातूशास्त्र, यंत्रअभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, औषधशास्त्र, कृषिशास्त्र, गणितशास्त्र, ग्रंथालयशास्त्र, जीवशास्त्र, तत्त्वज्ञान व तर्कशास्त्र, प्राणिशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, भूगोल, लोकप्रशासन, वाणिज्य, वैद्यकशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन, शिक्षणशास्त्र, समाजशास्त्र, साहित्यसमीक्षा, संख्याशास्त्र इत्यादी विषयांना वाहिलेले पारिभाषिक संज्ञाकोश निर्माण केले. या कोशांतील अनेक संज्ञा आता व्यवहारात प्रचलित झाल्या आहेत.

मराठीतील कोशकार्याबद्दल समाधान वाटावे अशी कोशनिर्मितिक्षेत्राची प्रगती आहे हे नि:संशय. याचा अर्थ झालेल्या कोशकार्यात त्रुटी नाहीत असे नाही. तथापि झालेले काम मराठी भाषेच्या व वाङ्मयाच्या दृष्टीने निश्चितपणे महत्त्वाचे आहे. शेवटी कोणत्याही भाषेला प्राप्त होणारी समृद्धी जशी तीत उत्पन्न होणाऱ्या बहुविध साहित्यामुळे होत असते, तशीच तीत निर्माण होणाऱ्या कोशसंपदेतून होत असते.

कॉमेंट लिहा Follow हेही वाचा देश

बोर्नव्हिटा, नेस्ले सेरेलॅकची होणार चौकशी, काय कारण? वाढीव साखर शरीरासाठी किती वाईट?

सुपर व्हॅल्यू डेज 1-7 एप्रिलपासून विक्री थेट- किराणा मालावर 45% पर्यंत सुपर बचत

नाशिक

'उमेदवारीबाबत गोडसेंनी लवकरच गोड बातमी द्यावी', मंत्री छगन भुजबळ असं का म्हणाले?

Live

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

Amazon Dell Days वर वेड्या किमतीत लॅपटॉप - सेल 23 फेब्रुवारीपर्यंत थेट

मुंबई

पंगतीला निघाले, बुंदी कधी? एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडला, अंतर्गत कलहाचा फटका?

आयपीएल

RR vs MI: मॅच झाल्यानंतर हार्दिक आणि मुंबई इंडियन्सला मिरची झोंबली; रोहित शर्माच्या कृतीची जगभर चर्चा

देश

घरात घुसून धाड धाड धाड... भाजप नेत्याच्या मुलाच्या हत्येचं रहस्य उलगडलं, भावानेच दिली सुपारी

मुंबई

तीन महिन्यांपूर्वी ठाकरेंचा भाजपसह येण्याचा प्रयत्न, मात्र आता दारं कायमची बंद, प्रसाद लाडांची स्पष्टोक्ती

नाशिक

नाशिकचा निर्णय होणार, पहाटे ३ पर्यंत गोडसे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, अखेर पेच सुटणार?

सौंदर्य

Highlighter For Hair :केसांना डॅमेज न करता मिळवा ट्रेंडी लुक्स, अनेक रंगांच्या शेडमध्ये उपलब्ध

फॅशन

Fish cut Petticoat: स्लिम आणि परफेक्ट लूकसाठी ट्राय करा हा पेटीकोट; साडीसोबत सुद्धा ट्राय करून पहा

लाईफस्टाईल

सारा अली खानचा काळ्या गाउनमध्ये हॉट लूक

दिनविशेष

<strong>Hanuman Jayanti 2024 : श्री हनुमानाच्या ४ प्रिय राशी, हनुमान जयंतीला शनिप्रकोप आणि मंगळदोषापासून मुक्ती मिळण्यासाठी करा हे उपाय</strong>

व्हायरल न्यूज

​‘पांड्यानं मुंबई इंडियन्सला केलं फिनिश’, हार्दिकच्या टूक टूक बॅटिंगवर गंमतीशीर मीम्स व्हायरल

महत्वाचे लेख ज्ञानभांडाराची किल्ली! शहर स्वच्छतेचा मापदंड महाभारताचा नवा अन्वयार्थ

कोवळ्या जिवांना कॅन्सरचा फास

नारिंगी रंगाचे शहर… मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी… Marathi News App

: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा

Maharashtra Times फेसबुक पेज

एक नजर बातम्यांवर :

लोकसभा 2024

लोकसभा निवडणूक 2024 चे वेळापत्रक

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या बातम्या

लोकसभा निवडणूक मतदारसंघांची यादी

महाराष्ट्र निवडणूक उमेदवारांची यादी

IPL 2024 निवडणूक ताज्या बातम्या थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील ताज्या बातम्या :

महाराष्ट्र बातम्या ठाणे बातम्या मुंबई बातम्या पुणे बातम्या नवी मुंबई बातम्या नाशिक बातम्या नागपूरची बातमी

छत्रपती संभाजी नगर बातम्या

कोल्हापूरची बातमी सातारा बातम्या सोलापूर बातम्या मराठी बातम्या : विदेश देश कार-बाइक इन्फोटेक भविष्य करिअर Viral अर्थ व्हिडिओ वेबस्टोरी मटा ई पेपर गुन्हेगारी बातम्या संपादकीय कृषी राजकारण सरकारी योजना मटा सुपरवुमन क्रीडा : क्रीडा बातम्या क्रिकेट बातम्या कबड्डी फुटबॉल क्रीडा वेबस्टोरी मनोरंजन : मनोरंजन बातम्या टीव्ही बातम्या मूव्ही रिव्ह्यू बॉलीवूड बातम्या सिनेमा बातम्या मनोरंजन वेब सीरिज नाटक बॉक्स ऑफिस लाईफस्टाईल : लाईफस्टाईल बातम्या ब्यूटी टिप्स आरोग्य बातम्या प्रेग्नन्सी-पालकत्व रिलेशनशीप फॅशन हेल्थ वेबस्टोरी ब्युटी वेबस्टोरी लाइफस्टाइल फोटो लाइफस्टाइल वेबस्टोरी खाद्यपदार्थ वेबस्टोरी होम डेकॉर भविष्य : दैनिक राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य दैनंदिन मराठी पंचांग दिनविशेष उत्सव आर्थिक कुंडली अंकशास्त्र वास्तुशास्त्र टेक : मोबाइल रिव्ह्यू टिप्स-ट्रिक्स कंप्युटर फोटो वेबस्टोरी विज्ञान-तंत्रज्ञान बिझनेस : बिझनेस बातम्या शेअर बाजार रिअल इस्टेट बातम्या क्रिप्टोकरन्सी अर्थ TimesXP Videos : Maharashtra News Videos National Videos Sport Videos Entertainment Videos Health Tips Videos Beauty Tips Videos ABOUT :

This website follows the DNPA’s code of conduct

Colombia Ads and Publishing

About Us Privacy Policy Terms and Conditions

Copyright - 2022 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

Times Syndication Service Cookie Settings ओह... तुम्ही ऑफलाइन आहात।